Beed Accident

Beed Accident : रुग्णाला घेऊ जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

1052 0

बीड : बीडमधून (Beed Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनगरकडे रुग्णाला घेऊन जात असताना दौलावडगावच्या दत्तमंदीराजवळ रुग्णवाहिका आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. रात्री बारा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. यामध्ये सांगवीपाटण येथील डॉ.राजेश झिंजुर्के आणि रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर भरत लोखंडेसह अन्य दोन जण असे चौघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

काय घडले नेमके?
आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक हा धामणगावकडून अहमदनगरकडे जात होता. रात्री 12 वाजेदरम्यान व्यंकटेश कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे (वय 35 वर्षे, रा.धामणगाव), मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे (दोन्ही राहणार जाटदेवळा) यांचा जागीच मृत्यू झाला.

ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात
दौलावडगाव शिवारात रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याची घटना ताजी असताना बीडमध्ये अजून एक अपघाताची घटना समोर आली आहे. बीडच्या जामखेड-अहमदनगर मार्गावरील आष्टा फाट्याजवळ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. आज पहाटे सकाळी 6 वाजता हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच 25 प्रवासी जखमी झाले असून, नऊ जण गंभीर आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!