Indrani Balan Foundation

Indrani Balan Foundation : इंद्राणी बालन फाऊंडेशनकडून लोणी धामणी शाळेला स्कुल बस भेट

388 0

पुणे : इंद्राणी बालन फाऊंडेशनकडून (Indrani Balan Foundation) आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी येथील श्री भैरवनाथ विद्याधाम शाळेसाठी स्कुल बस भेट देण्यात आली आहे. बालन व धारीवाल कुटुंबियाकडून ही बस रविवारी ग्रामस्थांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून लोणी धामणी गावात अनेक विकासकामे करण्यात आली आहे.

गावासाठी रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. तसेच शाळेची भव्य अशी इमारत फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून स्कुल बस देण्याचे आश्वासन फाऊंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी दिले होते. त्यानुसार रविवारी इंद्राणी बालन फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन, आरएमडी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारीवाल,माणिकचंद ऑक्सीरिच च्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल- बालन यांच्या हस्ते लोणी धामणी येथील माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीकडे ही स्कुल बस सुपुर्द करण्यात आली.

यावेळी राज्याच्या गृह विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयराजे वाळूंज. खजिनदार बाळासाहेब गायकवाड, समन्वयक चेतन लोखंडे व अन्य पदाधिकारी व लोणी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्त पी एस आय प्रकाश वाळुंज यांनी आभार मानले.

Share This News
error: Content is protected !!