Dhule News

Dhule News : धक्कादायक ! आजोबांच्या डोळ्यांदेखत बिबट्याचा नातवावर भीषण हल्ला

541 0

धुळे : दोन दिवसांपूर्वी धुळे तालुक्यातील (Dhule News) नंदाळे बुद्रुक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एका लहान मुलीला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असताना बोरकुंड येथील एका 6 वर्षीय चिमुकल्याला बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे. हार्दिक उर्फ स्वामी दीपक रोकडे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परीसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
स्वामी दीपक रोकडे असे मयत मुलाचे नाव आहे. तो मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतात खेळत होता. तेव्हा अचानक बिबट्याने हल्ला करीत त्याला उचलून घेऊन ठार केले. या घटनेनंतर बोरकुंड परिसरातील नागरिकांनी शिरुड-बोरकुंड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.यावेळी लोकांनी वनविभाग आणि पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर रोष व्यक्त केला. दसऱ्याच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!