Eknath Khadse

Eknath Khadse : ‘राजकीय दबावापोटी आम्हाला आलेली 137 कोटी रुपयांची नोटीस चुकीची’, एकनाथ खडेंसाचा दावा

483 0

जळगाव : राजकीय दबावापोटी आम्हाला 137 कोटी रुपयांची नोटीस आली असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याकडून करण्यात आला आहे. अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या कुटुंबाला 137 कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आली. या नोटीशीमध्ये एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे तसेच भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचेदेखील नावदेखील टाकण्यात आले आहे. यावर आता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?
एकनाथ खडसे यावर प्रतिक्रिया देताना म्हंटले आम्हाला आलेली नोटीस ही चुकीची असल्याचं म्हटलं. ‘राजकीय दबावापोटी आम्हाला 137 कोटी रुपयांची नोटीस आली. आमच्याकडेही पर्याय आहेत. आम्हालाही घोटाळे बाहेर काढता येतात’, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मुक्ताई नगर तालुक्यामध्ये सतोड शिवारामध्ये खडसे परिवाराच्या मालकीची 33 एकर जमीन आहे. या जमिनीतून अवैध गौण खनिज उत्सखनन झाल्याचं समोर आलं आहे. याचप्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने चौकशी करुन अहवाल सादर केला. हा अहवाल महसूल विभागाने मान्य करुन त्यांना 137 कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची नोटीस बजावली. या नोटीशीमध्ये एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे तसेच भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसेंवर पुढे कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!