सातारा : साताऱ्यामधून (Satara News) एक मोठी बातमी समोर आली आहे. सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या निवासस्थानासमोर निवासस्थानासमोर प्रकाश ढाका या हॉकर्स व्यवसायिकांनी पत्नी समवेत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.
शंभूराज देसाईंच्या निवासस्थानाबाहेर दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न pic.twitter.com/prHdlHs3fK
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) October 20, 2023
या दाम्पत्याला साहिल नावाच्या गुटखा व्यवसायकानं दोन लाखाची खंडणी मागितली होती. पोलीस या गुटखा व्यवसायिकाला पाठीशी घातल्याचा घालत असल्याचा आरोप डागा यांनी केला असून गुटखा व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ते करत होते मात्र पोलिसांकडून टाळाटाळ केल्यामुळे त्यांनी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या निवासस्थानाबाहेर ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला आहे.