Lalit Patil

Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलची मासिक कमाई किती? धक्कादायक माहिती आली समोर

540 0

पुणे : देशातील विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील ससून रुग्णालयात दोन कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला तामिळनाडूमधून अटक केली आहे. ललित पाटील हा पिंपरी-चिंचवडमध्ये ड्रग्जची विक्री केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. परंतु आजारी असल्याने त्याच्यावर ससून रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना देखील आरोपी ललित पाटील याने ड्रग्जची तस्करी सुरूच ठेवली. ही गोष्ट उघडकीस येताच त्याने ससून रुग्णालयातून पलायन केले. त्यातच आता पोलीस तपासातून ललित पाटीलच्या मासिक उत्पन्नासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

ड्रग्जची तस्करी आणि विक्री केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपी ललित पाटील याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्यानंतर आता त्याचे फाईव्ह स्टार हॉटेलमधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.ड्रग्ज माफिया ललित पाटील हा ड्रग्जच्या काळ्या धंद्यातून दर महिन्याला 50 लाख कमवत असल्याचे समोर आले आहे. ललित पाटील हा कारागृहात आणि ससून रुग्णालयात फाईव्ह स्टार सुविधांचा लाभ घेत होता अशीदेखील माहिती तपासातून समोर आली आहे. यामुळे ललित पाटीलच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.

आरोपी ललित पाटील हा नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावात 2021 सालापासून ड्रग्जचं उत्पादन करून त्याची तस्करी करत होता. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि देशातील अनेक राज्यांमध्ये ललित पाटील ड्रग्ज सप्लाय करत होता. ड्रग्ज माफिया ललित पाटील हा मूळ नाशिक जिल्ह्यातला आहे. एवढेच नाहीतर अनेक बड्या नेत्यांशी देखील ललित पाटील याचे संबंध असल्याचे समोर आले आहे. आता त्याला अटक करण्यात आल्याने काही बड्या नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!