मुंबई : एसटी (ST) कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाची दिवाळी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची जाणार आहे. सानुग्रह अनुदान म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये मिळणार आहेत. हे अनुदान दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सानुग्रह अनुदानासोबतच सण आग्रिम म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं. कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं होतं. मात्र आता एसटीची गाडी हळूहळू रुळावर येत असून, एसटी कर्मचाऱ्यांबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. आता एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही रक्कम दिवळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच सण अग्रिम म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी आनंदात जाणार आहे.