Fadanvis and lalit Patil

Lalit Patil : ललित पाटीलला अटक ! ‘आता अनेकांची तोंड बंद होतील’, फडणवीसांनी दिला इशारा

571 0

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा आरोपी 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेला 15 दिवसांचा कालावधी होऊन देखील आरोपी ललित पाटीलचा शोध लागत नव्हता. आज अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. मुंबई पोलिसांनी त्याला तामिळनाडूील चेन्नई येथून अटक केली आहे.

त्याला आज अंधेरी कोर्टात हजर केले असता त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यादरम्यान ललित पाटीलने मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवून नेलं..कोणाचा हात आहे सर्व सांगेन असा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. ललित पाटील याच्या अटकेनंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘यातून मोठं नेक्सस बाहेर येईल, काही गोष्टी मला आत्ता ब्रीफ झाल्या त्या सांगू शकत नाही, त्या योग्य वेळी सांगेन. पण एवढच सांगतो की यातून मोठा नेक्सस आम्ही बाहेर काढणार आहोत आणि बोलणाऱ्यांची तोंड बंद होणार आहेत. ललित पाटील सापडल्यानंतर तो काय बोलतो याच्यापेक्षा जो काही नेक्सस सापडणार आहे, त्यातून सगळ्यांची तोंडं बंद होतील. चौकशी सुरू आहे, कुणालाही सोडणार नाही. सर्व दोषींवर कारवाई केली जाईल’, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!