Mumbai Crime News

Mumbai Crime News : मुंबईमध्ये सैराटची पुनरावृत्ती ! करण-गुलनाजच्या लव्हस्टोरीचा भयानक शेवट

979 0

मुंबई : मुंबईमधून (Mumbai Crime News) ऑनर किलिंगचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एका मुस्लीम कुटुंबाने स्वतःच्या मुलीची आणि हिंदू जावयाची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. आरोपी गोरा खानने त्याचा मुलगा आणि साथीदारांसोबत मिळून आपली मुलगी गुलनाज खान आणि तिचा हिंदू पती करण चंद्र यांची हत्या केली आहे. या घटनेमुळे मुंबईमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
करण आणि गुलनाज यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये लग्न केले. यानंतर ते मुंबईमध्ये आले. आरोपी गोरा खान याने आपल्या जावयाला मुंबईतील आपलं नवीन घर दाखविण्याच्या बहाण्याने गोवंडी परिसरात बोलावलं. यानंतर जावयाला निर्जनस्थळी नेलं आणि त्याची निर्घृणपणे हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकून दिला.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर जावयाच्या हत्येनंतर त्याने स्वतःच्या मुलीलाही संपवलं. करणच्या हत्येनंतर आरोपींनी गुलनाजची हत्या केली आणि तिचा मृतदेह नवी मुंबईत फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. यामध्ये मृत गुलनाजचे वडील, भाऊ आणि त्याचा मित्र यांचा समावेश आहे.

Share This News
error: Content is protected !!