Lalit Patil

Lalit Patil : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला तामिळनाडूमधून अटक

1314 0

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा आरोपी 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेला 15 दिवसांचा कालावधी होऊन देखील आरोपी ललित पाटीलचा शोध लागत नव्हता. आज अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. मुंबई पोलिसांनी त्याला तामिळनाडूील चेन्नई येथून अटक केली आहे.

या अगोदर पुणे पोलिसांनी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोन आरोपींना उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्या दोघांना 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी तामिळनाडू येथून अटक केली.

ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले होते. ललित पाटीलला रुग्णालयात दाखल करण्यापासून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी राजकीय नेत्यांनी मदत केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.

Share This News
error: Content is protected !!