World Cup 2023

World Cup 2023 : प्रेक्षक गॅलरीत कोसळलं भलं मोठं होर्डिंग; BCCI चे पितळ पडलं उघड

560 0

वर्ल्ड कप सुरू होण्याआधी (World Cup 2023) कमीतकमी 6 महिन्याआधी वेळापत्रक जाहीर होतं. मात्र, यंदाच्या वर्षी वेळापत्रक (World Cup 2023) जाहीर होण्यासाठी उशीर झाला. फक्त महिनाभर आधी वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर झालं. त्यातही सणावळ्यांमुळे सामन्याच्या तारखांमध्ये फेरबदल करण्यात आले. त्यामुळे एकंदरीत पूर्ण नियोजन सेट होण्यासाठी वेळ लागला. त्यातच आता बीसीसीआयच्या नियोजनाचं पितळ उघडं पडलं आहे. वर्ल्ड कपच्या 14 व्या सामन्यात धक्कादायक घटना पहायला मिळाली. प्रेक्षक गॅलरीत भलं मोठं होर्डिंग कोसळल्याने प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय घडले नेमके?
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 210 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलियाने आव्हान पूर्ण केलं अन् श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला. हा सामना पाहण्यासाठी लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये चाहत्यांनी हजेरी लावली होती. सामना संपल्यानंतर प्रेक्षक गॅलरीत भलं मोठं होर्डिंग कोसळलं. लखनऊमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यानंतर स्टेडियमवरचे पत्रे उडून पडाल्याचं दिसून आलं. त्यावेळी स्टेडियमच्या खुर्च्यावर कुणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. उरलेल्या प्रेक्षकांनी पळ काढला अन् जीव वाचवला. या घटनेमुळे BCCI चे पितळ उघडे पडले आहे. या घटनेमुळे क्रिकेटच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Share This News
error: Content is protected !!