milind deora

Milind Deora : मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार; राष्ट्रवादी प्रवेशाच्या अफवांवर मिलिंद देवरांचे स्पष्टीकरण

708 0

मुंबई : मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा (Milind Deora) हे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता देवरा यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. माझा जन्म काँग्रेसमध्ये झाला आणि मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यामुळे देवरा हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून ते माजी खासदारही आहेत. मुंबई काँग्रेसमधील गटबाजीमुळे ते सध्या नाराज असल्याने राजकारणापासून दूर असल्याची चर्चा आहे. राज्यात जर महाविकास आघाडीने एकत्रित निवडणुका लढवण्याचं ठरवलं तर मिलिंद देवरा यांची जागा ही शिवसेना ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे.

कोण आहेत मिलिंद देवरा?
मिलिंद देवरा हे दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. 2004 आणि 2009 साली ते दक्षिण मुंबईतून निवडून आले होते. डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय राज्यमंत्रीही होते. मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांच्या जवळचे नेते आहेत. पण काँग्रेसमधील गटबाजीमुळे ते सध्या पक्षापासून दूर असल्याची चर्चा आहे.

Share This News
error: Content is protected !!