Gadchiroli News

Gadchiroli News : गडचिरोलीमधील ‘त्या’ हत्येचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश

907 0

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील दवंडी गावातील एका किराणा दुकानदाराची निर्घृण हत्या केल्याची घटना 11 ऑक्टोबर रोजी घडली होती. या सिनेस्टाईल खुनाचा उलगडा करण्यात अखेर बेडगाव पोलिसांना यश आले. अनैतिक संबंधातून अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकर व अन्य एकाच्या मदतीने नियोजनबद्धपणे कट रचून काटा काढला. पोलिसांनी या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

काय घडले होते नेमके?
लखन सुन्हेर सोनार (वय 38) असे मयताचे नाव आहे. त्यांचे गावात किराणा दुकान होते. 11 ऑक्टोबरला रात्री मारेकर्‍यांनी दरवाजाची कडी ठोठावली. पत्नीने दरवाजा उघडल्यावर तिला ढकलून देत तोंडाला काळे कपडे बांधून आलेल्या पाच ते सहा जणांनी खाटेवर झोपलेल्या लखन यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. पाच ते सहा जण तोंडाला काळे कपडे बांधून आले होते. पत्नी सरिता हिने अशी फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात पाच ते सहा इसमांविरोधात बेळगाव पोलीस मदत केंद्रात खुनाचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी या प्रकरणी पत्नी सरिता, प्रियकर सुभाष नंदेश्वर (रा. दवंडी) व त्याचा सहकारी बळीराम गावडे (रा. कुडकेल तालुका कोरची) यांना अटक केली आहे. या तिघांनीही आपला गुन्हा मान्य केला आहे. त्यांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!