Congress

Congress Candidates List : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणासाठी काँग्रेसकडून पहिली यादी जारी

1314 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून तीन राज्यांसाठी उमेदवारांची यादी (Congress Candidates List) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. काँग्रेसने रविवारी, 15 ऑक्टोबरला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या यादीत मध्य प्रदेशातील छिंदवाडा जागा व्हीआयपी सीट मानली जात आहे. याचं कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री कमलनाथ येथून निवडणूक लढवत आहेत. कमलनाथ यांच्या मतदारसंघात भाजपने विवेक बंटी साहू यांना तिकीट दिलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांनी विवेक बंटी साहू यांचा 25 हजार मतांनी पराभव केला होता.

मुख्यमंत्री भूपेश बघेल पाटण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री असलेले बघेल हे इथून तीन वेळा आमदार झाले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी ही जागा 28000 मतांनी जिंकली होती.

तेलंगणा राज्यात तीन व्हीआयपी जागा आहेत, ज्यासाठी काँग्रेसने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. SC उमेदवारांसाठी राखीव आंदोळे विधानसभा जागेवर काँग्रेसने सी. दामोदर राजा नरसिंह यांना तिकीट दिलं आहे.तर दुसरी महत्वाची जागा मधीरा विधानसभा आहे. येथून भट्टी विक्रमार्का मल्लू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!