विरार : विरार (Virar News) मधील दोन तरुणावर अज्ञात व्यक्तीने गोळी बार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वज्रेश्वरी अंबाडी वासिम रस्त्यावर शुक्रवार रात्री 9:30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
फिरोज रफिक शेख (वय 27) आणि अजीम अस्लम सय्यद (वय 30) अशी जखमी तरुणांची नावे असून त्यांच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी हा लाल कलरच्या सीबीझेड गाडीवरून मास्क बांधून आला होता, आरोपीने सहा राऊंड फायर केले. त्यापैकी तीन गोळ्या दोघांना लागल्या. फिरोजच्या मानेला गोळी लागून आरपार निघाली आहे तर अजीमच्या पोटात आणि पायावर दोन गोळ्या लागल्या आहेत.
जखमी फिरोज आणि अजीम हे विरार पूर्व चंदनसार ईदगा मैदान परिसरतिल राहणारे आहेत. हा गोळीबार कोणी व कोणत्या कारणावरून केला आहे. हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. आरोपींनी घटनास्थवरून पळ काढला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी आरोपी विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            