Dhule Bus Accident

Dhule Bus Accident : धुळ्यात खासगी बसला भीषण अपघात; 20 जण जखमी

559 0

धुळे : राज्यात सध्या अपघातांचे (Dhule Bus Accident) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील एसटी बस अपघाताची घटना ताजी असतानाच आता धुळ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये धुळे जिल्ह्यातील शिंदखेड्यात एका खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील नरडाण्यात हा अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे 20 प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवावे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

काय घडले नेमके?
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातल्या मुंबई-आग्रा महामार्गावर आज भल्या सकाळी उत्तर प्रदेशची पासिंग असलेल्या एका खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. या घटनेत 20 प्रवासी जखमी झाले असून काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही अपघातग्रस्त बस पुण्याहून उत्तर प्रदेशातील गोरखपुरला जात होती.

या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचावकार्यला सुरुवात केली. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!