Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर हादरलं ! दीड लाखांच्या कर्जापायी एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

1638 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या गरीब शेतकरी कुटुंबाची अक्षरश: वाताहत झाल्याचे अत्यंत हृदयद्रावक वास्तव छत्रपती संभाजीनगरातून पुढं आले आहे. 15 वर्षांपूर्वी घेतलेल्या दीड लाखाची परतफेड होत नसल्याने तिघांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ गावामध्ये ही घटना घडली आहे. सततची नापिकी आणि तब्बल 15 वर्षांपूर्वी आजोबांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्याने सोमनाथ भोसले या 30 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. वडील आणि भावाने याच कर्जाच्या चक्रात आत्महत्या केल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सोमनाथवर येऊन पडलेली होती. मात्र कर्जाचा बोजा वाढत असल्याने त्याची परतफेड कशी करावी या विवंचनेत तो गेल्या महिन्यापासून वावरत होता.

याच विवंचनेतून शेतकरी सोमनाथ पंडित भोसले याने घराजवळील शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. सोमनाथच्या आजोबांनी खाजगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. मात्र त्याची परतफेड होत नसल्याने भोसले कुटुंबातील तिघांना आत्महत्या करावी लागली आहे.या कर्जाच्या जाचापायी 2008 मध्ये वडील पंडित भोसले तर 2019 मध्ये मोठा भाऊ गजानन भोसले यांनी आत्महत्या केली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!