Mumbai News

Mumbai News : पिटीचा तास सुरु असताना अचानक खाली कोसळून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

1111 0

मुंबई : मुंबईमधून (Mumbai News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शाळेत पीटीचा क्लास सुरू असतानाच एका 13 वर्षीय विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाला आहे. कांदिवली येथील एका शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. त्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळं झाला, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. मृत विद्यार्थी हा मूळचा गुजरातचा असून शिक्षणासाठी म्हणून तो मुंबईत आला होता. कांदिवली येथे तो हॉस्टेलमध्ये राहत होता.

काय आहे नेमके प्रकरण?
ओम सचिन गंडेचा असे त्या मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो आरजे मखिजा शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. काही दिवसांपूर्वीच त्याला डेंग्यू झाला होता. मात्र, त्यातून तो बरा देखील झाला होता. सोमवारी शाळेत पीटीचा क्लास सुरु असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो मैदानातच खाली कोसळला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना याबाबत माहिती दिली. यानंतर शिक्षकांनी त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले. मात्र त्याच्याकडून कसलीच हालचाल जाणवली नाही. यानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नंतर त्याला बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हलवण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केले.

ओमला दहा दिवसांपूर्वी डेंग्यू झाला होता. पण त्यातून बरा झाला होता व नियमित शाळेतही जावू लागला होता. ओमचे पालक गुजरात येथे राहतात. ओमच्या मृत्यूची माहिती त्याना देण्यात आल्यानंतर ते लगेचच मुंबईत दाखल झाले होते. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह पालकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. तसंच, अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकणार आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!