Samruddhi Highway

Samruddhi Highway : विशेष सरकारी वकिलांचा समृद्धी महामार्गावर अपघात

2931 0

नाशिक : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) अपघातांची मालिका काही कमी होताना दिसत नाही आहे. यादरम्यान आता विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. या अपघातात अजय मिसर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अजय मिसर हे श्रीरामपूर ते मुंबई असा नाशिकमार्गे प्रवास करत होते. दुपारी त्यांचा ताफा समृद्धी महामार्गावरून मार्गस्थ होत होता. घोटी ओलांडल्यानंतर इगतपुरीजवळच्या भरवीर बुद्रूक शिवारात त्यांची गाडी समोरच्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात त्यांच्या पायांना आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या खांद्याला मुका मार लागला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलिस आणि रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर तिथेच प्रथमोपचार देण्यात आले. दरम्यान वकील अजय मिसर यांच्यासह सहाय्यक वकील वाहनचालक यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!