Sangli Crime

Sangli Crime : चादर धुण्यासाठी तलावाकडे गेले अन्.. सांगलीत बाप -लेकाचा दुर्दैवी अंत

522 0

सांगली : सांगलीमध्ये (Sangli Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बंडगरवाडी या ठिकाणी घडली आहे. राजेंद्र आप्पाणा चव्हाण (वय 47) आणि मुलगा कार्तिक राजेंद्र चव्हाण (वय 17) अशी मृत्यू झालेल्या बाप लेकांची नावे आहेत.

काय घडले नेमके?
घरातील चादरी धुण्यासाठी राजेंद्र चव्हाण मुलगा कार्तिकला घेऊन गावातल्या तलावावर गेले होते. यावेळी चादरी धुण्यासाठी तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघे बाप-लेक पाण्यात बुडाले. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस आणि H.E.R.F रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या टीमकडून रात्री उशिरापर्यंत बाप – लेकाचा शोध सुरु होता. रात्री उशिरा या दोघांचे मृतदेह शोधण्यात टीमला यश आले. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तलावात चादरी धुण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News
error: Content is protected !!