Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवार यांचा पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा

732 0

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय. विशेष म्हणजे अजित पवार गेल्या 32 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक होते. अजित पवार 1991 पासून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहत होते. बँक राज्यात नंबर वनला आणण्यामध्ये अजित पवारांचा मोठा वाटा आहे. त्यांनी आज अचानक जिल्हा बँकेचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. जिल्हा बँँकेच्या अध्यक्षांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

“उपमुख्यमंत्रीपदाचा वाढता व्याप आणि पक्षाची वाढती जबाबदारी लक्षात घेता अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अजित पवार यांची पकड असून 1991 पासून अजित पवार हे सलग पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवडून येतात आत्तापर्यंत तब्बल सात वेळा या बँकेचं अध्यक्ष पद देखील अजित पवार यांनी भूषवलं आहे. दरम्यान आता अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी संचालक म्हणून कोणाची निवड होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!