Bodybuilder

Bodybuilder : धक्कादायक ! प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा दुर्दैवी मृत्यू; ‘ती’ चूक बेतली जीवावर

2440 0

चेन्नई: मिस्टर तमिळनाडू खिताब जिंकणारा प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू (Bodybuilder) योगेश अंबत्तूर मेनमपडू याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हृदय विकाराच्या झटक्यानं त्याचे निधन झाले आहे. तो एक्सटेंशन परिसरातील ज्ञानमूर्ती नगरात वास्तव्यास होता. त्यानं अनेक शरीरसौष्ठत्व स्पर्धा गाजवल्या होत्या. या स्पर्धांमध्ये त्यानं कित्येक बक्षिसं जिंकली. 2022 मध्ये त्यानं 9 स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. मिस्टर तमिळनाडू खिताबादेखील त्याने आपल्या नावावर केला होता.

2021 मध्ये योगेशचं लग्न झालं. त्याला एक लहान मुलगी आहे. लग्नानंतर वर्षभरानं योगेशनं बॉडीबिल्डिंगपासून ब्रेक घेतला. त्यानंतर त्यानं विविध जिममध्ये प्रशिक्षक म्हणून काम सुरू केलं. काही वर्षांपासून तो कोराटूर बस स्थानकाजवळ असलेल्या एका जिममध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. पुढील महिन्यात होणाऱ्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी त्याने मागच्या काही दिवसांपासून तयारी सुरु केली होती. मृत्यूच्या काही वेळापूर्वी योगेशनं व्यायाम केला. त्यानंतर त्यानं जिममधील काही तरुणांनादेखील मार्गदर्शन केलं.

घटनेच्या वेळी त्याने तासभर व्यायाम केल्यानंतर योगेश दमला. स्टीम बाथ घेण्यासाठी गेला. मात्र अर्धा तास उलटून गेल्यानंतरही योगेश बाहेर न आल्यान सहकाऱ्यांना संशय आला. त्यांनी बाथरुमकडे धाव घेतली. ते आतून बंद होतं. आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यानं त्यांना दार तोडलं. योगेश आतमध्ये जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडला होता. सहकाऱ्यांनी योगेशला केएमसी रुग्णालयात दाखल केलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

‘ती’ चूक पडली महागात
‘स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे शरीरसौष्ठवपटू खूप व्यायाम करतात. बराच व्यायाम केल्यानंतर तातडीनं स्टीम बाथ घेऊ नये. असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. आणि नेमकी हीच चूक योगेशला भोवली. योगशने व्यायाम केल्यानंतर तातडीने स्टीम बाथ घेतले आणि त्याला आपला जीव गमवावा लागला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!