Bibtya

Indurikar Maharaj : धक्कादायक ! अचानक इंदोरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या

1626 0

अहमदनगर : इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या किर्तनाची शैली सर्वांनाच भुरळ घालते. त्यांच्या किर्तनाला लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आता पुन्हा एकदा इंदोरीकर महाराज चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी कारण वेगळेच आहे. ते म्हणजे इंदोरीकर महाराजांच्या राहत्या घरात चक्क बिबट्या शिरला आहे. या बिबट्याने तिथे असलेल्या एका कुत्र्याला देखील उचलून नेलं आहे. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय घडले नेमके?
प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांचं संगमनेर तालुक्यातील ओझर गावात घर आहे. या घरात चक्क बिबट्या घुसला असल्याचे समोर आले आहे. या बिबट्याने तिथे झोपलेलं एक कुत्रं देखील उचलून नेलं आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता दोन कुत्रे झोपलेले आहेत. तेवढ्यात तिथे अचानक बिबट्या येतो, त्यापैकी एका कुत्र्यावर तो हल्ला करतो आणि त्याला आपल्या सोबत घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढतो. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!