Shivsena

Shivsena : शिवसेना कुणाची? ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करा विधीमंडळ सचिवांची दोन्ही गटांना नोटीस

460 0

मुंबई : शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं आहे. आता शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आला आहे. शिवसेना कुणाची? ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करा, असे म्हणत विधीमंडळ सचिवांकडून शिंदे-ठाकरेंना नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे पुढील वेळापत्रक ईमेल द्वारे पाठवण्यात आले आहे.

दोन्ही गटांना आपले वर्चस्व सिद्ध करण्याची संधी आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता विधीमंडळाच्या निर्णयाकडे दोन्ही गटांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारी नोटीस बजावण्यात आली होती. शिंदे-ठाकरेंकडे उत्तर देण्यासाठी अवघा 8 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे.

Share This News
error: Content is protected !!