Afghanistan Earthquake

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप! 2,000 जणांचा मृत्यू

2074 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंपाच्या (Afghanistan Earthquake) धक्क्याने हादरले आहे. तालिबानी प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या पश्चिमी भागात शक्तीशाली भूकंप झाला आहे. या भूकंपात जवळपास दोन हजार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पश्चिम अफगाणिस्तानात ईराणच्या सीमेजवळ देखील भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले. या भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी आहे. या भूकंपामुळं हेरात शहरापासून जवळपास 40 किमी (25 मील) दूर असलेल्या अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक इमारती कोलमडून पडल्या आहेत.

देशातील सूचना व सांस्कृतिक मंत्रालयातील प्रवक्ता अब्दुल रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेरातमध्ये भूकंपात जीव गेलेल्या नागिरकांची संख्या मुळ आकड्यापेक्षा अधिक आहे. त्यांनी तात्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. या भूकंपात सहा गाव पूर्णपणे नष्ट झाली आहेत. तर, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एका अहवालानुसार या भूकंपात 465 घर नष्ट झाले असून 135 घरांचे नुकसान झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणमधील जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी 12 रुग्णवाहिका झेंडा जान येथे पाठवण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक जखमींवर रुग्णालयात उपचार करत आहेत. अतिरिक्त गरजांचे मूल्यांकन करुन मदत करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!