ODI World Cup 2023

ODI World Cup 2023 : आजपासून रंगणार विश्वचषकाचा रणसंग्राम; अहमदाबादच्या मैदानात इंग्लंड-न्यूझीलंड भिडणार

938 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी वन डे विश्वचषकाच्या महायुद्धाला (ODI World Cup 2023) आजपासून सुरूवात होणार आहे. अहमदाबादच्या रणांगणात इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना पार पडणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळण्यात येणार आहे. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास या सामन्याला सुरुवात होणार आहे.

वरचढ कोण ?
गेल्या महिन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये चार सामन्याची वनडे मालिका पार पडली होती. न्यूझीलंड संघाने पहिला सामना जिंकला होता. पण त्यानंतर इंग्लंडच्या संघाने वादळी कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने 79, तिसऱ्या सामन्यात 181, चौथ्या सामन्यात 100 धावांनी जिंकला होता. अखेरच्या दोन्ही सामन्यात इंग्लंडने 300 पेक्षा जास्त धावा केल्या. वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यातही 300 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विश्वचषकात हेड टू हेड –
वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत 10 सामने झाले आहेत. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच पाच सामने जिंकले आहेत. भारतामध्ये दोन्ही संघ फक्त एक वेळा आमने सामने आले आहेत, त्यामध्ये इंग्लंड संघाने बाजी मारली आहे. सध्या विश्वचषकातील आकडेवारी पाहता दोन्ही संघ समतोल वाटत आहेत.

विश्वचषकासाठी इंग्लंडची टीम
जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, सैम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मालन, आदिल राशिद, जो रूट, हैरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेविड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स.

विश्वचषकासाठी न्यूझीलंडची टीम
केन विलियमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चैपमैन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मैट हेनरी, टॉम लॅथम, डेरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सेंटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide