Satara Crime

Satara Crime : तरुणाचा खून करून पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपींचा; ‘त्या’ एका पावतीवरून पोलिसांनी लावला छडा

663 0

सातारा : साताऱ्यामध्ये (Satara Crime) एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये काही दिवसांपूर्वी पुणे-बंगळुरू महामार्गावर कराड तालुक्यातील वनवासमाची हद्दीत एका मोरीमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी आता छडा लावला आहे. केशवमूर्ती आर. चिन्नाप्पा रंगास्वामी (वय 37, रा. आरे हल्ली पो. मायासिंद्रा, ता. अनकेल, जि. बंगळुरू) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मंजूनाथ सी. (वय 33, रा. अरेहाली, पो. मायासंद्रा, ता. अनेकल, जि. बंगळूरु), प्रशांत भिमसे बटवाल रा. अमनेळी, ता. सिधगी, जि. विजापूर राज्य कर्नाटक), शिवानंद भिमरायगोड बिरादार (वय 26, रा. तोरवी, ता. तिकोटा, जि. विजापूर) या तिघांना पोलिसांनी केशवमूर्ती आर. चिन्नाप्पा रंगास्वामी याच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे.

काय घडले नेमके?
तळबीड पोलीस ठाणे हद्दीत दि. 29 रोजी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. यातील आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. तळबीड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून व या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. यावेळी त्यांना एका वाहनाची माहिती मिळाली. त्यांनी ज्या वाहनात इंधन भरले गेले, त्या वाहनाची माहिती घेतली असता ते वाहन बंगळूरू येथील असल्याचे समजले.

तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आर. आर. वरोटे पोलीस कर्मचाऱ्यांसह तपासासाठी रवाना झाले. त्यानंतर या आरोपीचा शोध घेतला असता आरोपी प्रशांत बटवाल हा कारसह पुणे येथेच असल्याचे तपासात निष्पन्न झाले, तर पुणे येथे रवाना झालेल्या दुसऱ्या तपास पथकाने आरोपी प्रशांत बटवाल याला कारसह ताब्यात घेतले. नंतर बंगळुरू येथील तपास पथकाने मुख्य आरोपी मंजुनाथ सी. यास बंगळूरू येथे पकडून ताब्यात घेतले. त्याचवेळी आरोपी शिवानंद बिरादार हा विजापूर येथे असल्याची माहिती मिळाली. तेव्हा बंगळूरू येथील तपास पथकाने परत विजापूर येथे जाऊन शिवानंद बिरादार यास ताब्यात घेतले.

‘या’ कारणामुळे खून
मृत व्यक्तीकडून आरोपी मंजुनाथ यांनी नोकरी लावण्यासाठी काही रक्कम घेतली होती. ती रक्कम संबंधित व्यक्ती मंजुनाथ यास परत मागत होता. ती रक्कम मंजुनाथ हा परत देत नव्हता, म्हणून मयत पोलिसामध्ये तक्रार देण्यास जाणार असल्याचे समजल्यानंतर मंजुनाथ याने त्यास दिल्लीला जाऊन तेथे सही करून येऊ, त्यानंतर तुला नोकरी देण्यात येईल, असे सांगून त्यास बोलावून घेतले. तसेच कारने आरोपी मंजुनाथ व प्रशांत बटवाल व शिवानंद बिरादार व मयत केशवमूर्ती असे दिल्लीला रवाना झाले. त्यांची कार ही कराड तालुक्यातील वनवासमाची गावच्या हद्दीत आली. या ठिकाणी केशवमूर्ती याला पोत्यात गुंडाळून महामार्गालगतच्या नाल्यात पेट्रोल अंगावर टाकून त्यास जिवंत जाळले असा जबाब आरोपींनी पोलिसांना दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!