Parbhani News

1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या 5 खंडणीखोरांना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

523 0

व्यावसायिकाला एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच खंडणीखोरांना चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

चाकण परिसरात राहणाऱ्या संजय धुलाप्पा कुरुंदवाडे हे व्यावसायिक आहेत. 21 सप्टेंबरला संजय धुलाप्पा कुरुंदवाडे हे आपल्या मोटर सायकलने घराकडे जात असताना, त्यांना काही आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलला रिक्षा आडवी लावून अडवल.आणि त्या नंतर त्यांचं अपहरण केलं होतं. अपहरण केल्यानंतर आरोपींनी संजय धुलाप्पा कुरुंदवाडे यांच्याकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

फिर्यादीने आरोपींना खंडणी देण्याचे मान्य केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला सोडलं होतं. मात्र आरोपीं पैकी एक इसम फिल्मी स्टाईलने खंडणी चे पैसे घेण्यासाठी आल्यानंतर चाकण पोलिसांनी या गुन्ह्यातील पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर दोन खंडणीखोर आरोपी अजूनही फरार आहेत. शुभम उर्फ सोन्या विनोद काकडे, आकाश विनायक भुरे, शुभम युवराज सरवदे ,अजय नंदू होले आणि नवनाथ शांताराम बच्चे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपी हे रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्यावर खून, मारामारी, जबरी चोरी, आणि अवैध शस्त्र बाळगणे असे गुन्हे चाकण, हडपसर, राजगड आणि भोसरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.

Share This News
error: Content is protected !!