Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : सरकारने आम्हाला चॉकलेट दाखवू नये; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

981 0

मुंबई : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे.मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नका. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. आमच्या आरक्षणात त्यांना वाटा नकोच, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. भुजबळांच्या या भूमिकेवर जरांगे पाटलांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. मराठ्यांना आरक्षण न देण्याचा ठेका तुम्ही चारपाच लोकांनी घेतला आहे काय?, असा संतप्त सवालदेखील मनोज जरांगे यांनी यावेळी विचारला. तसेच सरकारनेही आम्हाला चॉकलेट दाखवू नये, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणानंतर आता संवाद दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून जरांगे पाटील हे मराठा तरुणांना जागृत करत आहेत. त्यांना आरक्षणाचं महत्त्व सांगत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गावागावात त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यांच्यावर फुलांची उधळण केली जात आहे. तसेच त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी अबालवृद्ध आणि महिलाही मोठ्या संख्येने येत आहेत.

मनात आणि मतात बदल करा
भुजबळ आमचे वैयक्तिक दुश्मन नाहीत. ओबीसींना आरक्षण दिलं गेलं. तुमचं जीवमान उंचावलं. तेव्हा मराठ्यांनी तुम्हाला कधी विरोध केला नाही. तुमच्या प्रगतीच्या आणि आरक्षणाच्या आड आम्ही आलो नाही. मग आम्हाला मोठं करताना तुमची ही भावना अशी का? काय चुकीचं बोलतो आम्ही? असा सवाल करतानाच छगन भुजबळ यांनी त्यांच्या मतात आणि मनात बदल करावा. मराठा समाज त्यांच्या पाठी उभा राहील, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!