Pune Metro

Pune Metro : गणेशोत्सवामध्ये पुणे व पिंपरी चिंचवडकरांनी मेट्रोला दिली पसंती

827 0

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोतून (Pune Metro) प्रवासाला पुणे व पिंपरी चिंचवडकरांची पसंती दिली आहे. दिनांक 18/9/23 ते 28/9/23 या काळात पिंपरी चिंचवड स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावर 4,05.280 प्रवास झाला आणि यातून 63,23,718/- रुपये इतके उत्पन्न मिळाले. तर वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर 5,56,082 प्रवास झाला आणि यातून 77,47,336/- रुपये इतके उत्पन्न मिळाले. दिनांक 28 सप्टेंबर 23 रोजी पुणे मेट्रोमधून जास्त प्रवास होणारी स्थानके अनुक्रमे पीएमसी, डेक्कन जिमखाना, पीसीएमसी, वनाझ आणि गरवारे कॉलेज ही आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोने प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रोच्या वेळेमध्ये वाढ केली होती.

ऑगस्ट 2023 या महिन्यात एकूण प्रवास 21,16,772 इतका होता आणि यातून 3,25,88,900/- इतके उत्पन्न मिळाले. तर सप्टेंबर 2023 या महिन्यात (28 तारखेपर्यंत) 19,13,227 इतका प्रवास होऊन यातून 2,81,89, 760/- इतके उत्पन्न मिळाले. ऑगस्ट महिन्यातील सर्वात जास्त प्रवास (1,69,512) आणि उत्पन्न (30,63,350/-) हे दिनांक 15 ऑगस्ट 23 या दिवशी होते. सप्टेंबर महिन्यातील सर्वात जास्त प्रवास (1,63,227) आणि उत्पन्न (25,48,384/-) हे काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिनांक 28 सप्टेंबर 23 या दिवशी होते.

दिनांक 1 ऑगस्ट 23 रोजी पुणे मेट्रोच्या मार्गांचे विस्तारीकरण झाल्यापासून दिनांक 28 सप्टेंबर 23 पर्यंत पिंपरी चिंचवड स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावर 16,89,858 प्रवास झाला आणि यातून 2,67,44,304/- रुपये इतके उत्पन्न मिळाले. वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर 22,74,197 प्रवास झाला आणि यातून 3,22,42,665/- रुपये इतके उत्पन्न मिळाले.

पुणे मेट्रोचे पुढील मार्ग सुरू झाल्यापासून पालकमंत्री मा. चंद्रकांत दादा यांनी मेट्रोमधून दोन वेळा प्रवास केला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पालकमंत्री महोदय यांनी वनाज ते पीएमसी असा प्रवास केला. यावेळी त्यांच्या बरोबर महा मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर आणि महा मेट्रो चे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनावणे होते. पालकमंत्री महोदय यांनी मेट्रो प्रवासादरम्यान मेट्रो मधील स्वछतेचे कौतुक केले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!