जुन्या पेन्शन योजनेबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य म्हणाले…….

578 0

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची  शिक्षण परिषद  व वार्षिक अधिवेशन  पनवेल मधील कर्नाळा स्पोर्ट्स क्लबमध्ये पार पडले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  अध्यक्ष शरद पवार  यांनी शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 

शरद पवार म्हणाले, सध्या राज्यात फिरत असताना मला सातत्यानं एक निवेदन मिळत असतं की जुनी पेन्शन योजना लागू करा.

आम्ही संसदेचं अधिवेशन  संपलं की मुंबईत ग्रामविकास खात्याचे मंत्री , शिक्षणमंत्री  यांच्यासोबत मी स्वत: एक बैठक घेतो आणि जुनी पेन्शन बाबत काय करता येईल याबाबत चर्चा करतो, असं आश्वासन त्यांनी दिलं. आपण वेगवेगळे मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करु असंही पवार म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!