Gulabrao Patil

Women’s Reservation : महिला आरक्षण लागलं तर तुमच्याकडे ‘मामी’ आहेत; आमचं काय? गुलाबरावांनी मांडली व्यथा

697 0

जळगाव : महिला आरक्षणाच्या (Women’s Reservation) निर्णयामुळे आता जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण या मतदारसंघापैकी एका मतदारसंघात महिलांसाठी राखीव जागा निघणार आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात महिलांसाठी राखीव जागा निघाल्यास आमचं कठीण आहे, अशी भीती मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवली. जळगाव शहरात सखी वन स्टॉप सेंटर इमारतीच्या जागेचे भूमिपूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळी ते बोलत होते.

मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदार संघाचे आमदार आहेत. त्यामुळे मतदारसंघात महिलांसाठी राखीव आरक्षण निघालं, तर मोठी पंचायत होईल अशी भीती मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावरदेखील जोरदार टीका केली आहे.

एकनाथ खडसे यांचं कामच आहे विरोध करायचं, जर विरोध केला नाही तर त्यांची बातमी टीव्हीवर येणार नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे.

Share This News
error: Content is protected !!