Pune Crime News

Pune Crime News : खळबळजनक ! सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ लाईन बॉयचा खून

2560 0

पुणे : पुणे (Pune Crime News) सध्या गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनले आहे. सध्या पुण्यात गुन्ह्याचे प्रमाण खूप वाढले आहे. सिंहगड रस्त्यावर अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. लाईन बॉय विजय ढुमे यांचा धारदार हत्याराने आणि कोयत्याने सपासप वार करून खून झाला आहे. ही घटना सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका अतिशय शांततेत पार पडल्यानंतर सायंकाळी सिंहगड रस्त्यावर ही खळबळजनक घटना घडली आहे. विजय ढुमे हे सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा असून त्याचे अनेक बड्या पोलिस अधिकार्‍यांशी मैत्रीचे संबंध होते तसेच अनेक राजकारणी व्यक्तींशी त्यांचे चांगले संबंध होते. क्वॉलिटी लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर पडत असताना चार ते पाच हल्लेखोरांनी विजय ढुमे यांच्यावर अचानकपणे हल्ला करून त्याचा खून केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!