साफसफाई काम सुरू असताना मोशी औद्योगिक वसाहतीत स्फोट ; 8 जण जखमी

591 0

पिंपरी-चिंचवड  टाउनशिपमधील मोशी परिसरात एका धातूच्या स्क्रॅप युनिटमध्ये स्फोट झाला.यात आठजण किरकोळ जखमी झाले. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

17 मार्चरोजी एका धातूच्या स्क्रॅप युनिटमध्ये कमी तीव्रतेचा हा स्फोट झाला.

औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळी काही ठिकाणी साफसफाईचे काम सुरू असताना ही घटना घडली. या प्रकारानंतर लगेचच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळाल्यावर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या दुर्घटनेत युनिटमध्ये काम करणारे किमान आठ जण भाजले, असे अग्निशामकच्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. गंभीर दुखापत नसल्याची माहिती मिळत आहे.

Share This News
error: Content is protected !!