Pune Viral News

Pune Viral News : गणपती डान्स करणाऱ्यांना सुवर्णसंधी; विसर्जनात नाचा अन् 300 रुपये कमवा

670 0

पुणे : आजकालच्या जमान्यात कधी काय व्हायरल होईल (Pune Viral News) याचा काही नेम नाही. सध्या राज्यभरात गणेशोत्सवाची धुम पहायला मिळत आहे. दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. यासह गौरी गणपतीचेही विसर्जन झाले आहे. आता सर्वांना वेध लागले ते अनंत चतुर्थीच्या दिवशी होणाऱ्या बाप्पाच्या विसर्जनाचे अनेक जण हौसेने गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत मनसोक्त डान्स करतात. यादरम्यान सोशल मीडियावर एक जाहिरात प्रसिद्ध होताना दिसत आहे. यामध्ये गणपती डान्स करणाऱ्यांना रोजगाराची संधी देण्यात आली आहे.

वर्तमान पत्रात अनेक विषयांवर नोकरीविषयी देखील जाहिराती प्रसिद्ध होत असतात. जिथे नोकरी संदर्भातील जाहिराती असतात त्याच रखान्यात एक विचित्र जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे पाहायला मिळत आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून गणपती विसर्जन गर्दीत डान्स करणाऱ्यांना संधी दिली जाणार आहे. ही जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्याचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. मात्र, ठिकाण भोसरी असे नमूद करण्यात आले आहे. यावरुन भोसरी परिसरात गणपती विसर्जन गर्दीत डान्स करण्यासाठी मुलं मुली पाहिजेत असं स्पष्ट होत आहे. या जाहिरातीत संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर देखील देण्यात आला. ज्यांना जाहिरातीत इंटरेस्ट वाटतो त्यांनी 9373999454 या नंबरवर संपर्क करावा.

Image

काय आहे नेमके त्या जाहिरातीमध्ये?
गणपती विसर्जन गर्दी मध्ये गणपती डान्स करण्यासाठी फक्त एक दिवस दि 27 सप्टेंबर या दिवशी 100 मुले मुली पाहिजेत. वय 18 ते 30, वेळ संध्या 5 ते 10, स्थळ भोसरी, पे 300 रुपये पर डे. 9373999454 असा मजकूर या जाहिरातीत छपण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!