Jalna News

Jalna News : जालन्यात मध्यरात्री बस पुलाखाली कोसळून भीषण अपघात

435 0

जालना : जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवर (Jalna News) एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एक खाजगी बस पुलाखाली कोसळल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याहून नगरकडे जात असताना हा भीषण अपघात घडला आहे. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

काय घडले नेमके?
छत्रपती संभाजीनगर जालना रोडवर रात्री 12 वाजेच्या सुमारास बदनापूरजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट पुलाखाली कोसळली पूजा ट्रव्हल्सची ही बस होती. ही बस (एम एच 40 सी 6969) पुण्याहून नागपूरकडे जात होती. बदनापूरजवळून जात असताना हा अपघात घडला. या अपघातात बसमधील 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जालना पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!