ठाणे : ठाण्यातील (Thane Crime News) डोंबिवलीमध्ये बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका निर्दयी बापाने आपल्याच 9 वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. डोंबिवलीतल्या मानपाडा या ठिकाणी हि घटना घडली असून पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.
‘या’ कारणामुळे केली हत्या
आरोपी बापाचं नाव मनोजकुमार असे आहे. तो डोंबिवलतल्या मानपाडा याठिकाणी आपल्या कुटुंबासह राहातो. मनोज कुमारला चार मुली आहेत. याली एक मुलगी 9 वर्षांची होती आणि ती गतीमंद होती. ती सतत आजारी असायची मुलीला ऐकायला आणि बोलायला येत नव्हतं. तिच्या आजारपणाला आरोपी मनोज कुमार हा कंटाळला होता. त्यामुळे तो नैराश्यात होता.
याच सगळ्याला कंटाळून त्याने आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केली. या घटनेची माहिती मनोज कुमार याच्या पत्नीनेच पोलिसांना दिली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्ठळी धाव घेऊन आरोपी मनोज कुमारला अटक केली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. डोंबिवली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.