Viral Video

Viral Video : मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

679 0

मुंबई : सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यामध्ये काही हाणामारीचे व्हिडिओदेखील असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही महिलांची फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळत आहे. लोकलमधील स्टंटबाजी व सीटसाठी होणारी वादावादी व हाणामारी नित्याची बाब झाली आहे. मुंबईतील लोकलला होणाऱ्या गर्दीमुळे धक्का लागल्यावरून प्रवाशांची भांडणे आणि हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये दिसत आहे दोन महिला प्रवाशांनी एकमेकींना आधी कानशिलात लगावल्या व नंतरएकमेकींच्या झिंज्या उपटून हाणामारी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिला प्रवाशांच्या झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे. हा वाद नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Share This News
error: Content is protected !!