Nanded News

Nanded News : नांदेड हळहळलं ! शेवटपर्यंत साथ निभावली; पतीच्या निधनानंतर पत्नीनेदेखील सोडला जीव

715 0

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू असतानाच पत्नीनेदेखील आपला जीव सोडला आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील वळग या ठिकाणी ही हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीच्या निधनानंतर एक दिवसाच्या अंतराने पत्नीचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गंगाधर नागाजी चंदावाड (वय 70 वर्षे) आणि अंजनाबाई गंगाधर चंदावाड (वय 65 वर्षे) असे मृत पती -पत्नींची नावे आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
वळग गावातील गंगाधर चंदावाड आणि अंजनाबाई यांनी लग्नानंतर आयुष्याचे 50 वर्षे सोबत घातले. मात्र, अंजनाबाई आजारी पडल्याने गंगाधर चंदावाड यांच्या डोक्यावर आघात झाल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे चंदावाड दुःखाचे डोंगर कोसळले. याच सर्वाधिक धक्का अंजनाबाई यांना बसला होता. दरम्यान, गंगाधर यांच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू असतानाच दुसऱ्या दिवशी अंजनाबाई यांनी देखील आपले प्राण सोडले. पतीने जीव सोडला म्हणून पत्नीच्या डोक्यावरही आघात झाला आणि त्यांनी देखील पतीप्रमाणेच जगाचा निरोप घेतला.

गंगाधर चंदावाड आणि अंजनाबाई यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वडिलापाठोपाठ आईनेही प्राण सोडल्यामुळे त्यांची मुले व नातवंडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.एकाचवेळी पती-पत्नीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!