FD Rates

FD Rates : ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ 5 बँका FD वर देत आहेत भरघोस व्याज

395 0

गेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दरात अनेक वेळा वाढ केली आहे, परंतु हा दर बराच काळ स्थिर राहिला आहे. त्यामुळं अनेक बँकांनी त्यांचे FD चे व्याजदर (FD Rates) कमी केले आहेत. असे असले तरी काही बँका ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८ टक्क्यांहून अधिक व्याजदर देत आहेत. तर आज आपण अशा पाच बँकांबद्दल जाणून घेणार आहोत…

येस बँक एफडी दर
येस बँक ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 36 महिन्यांपासून ते 60 महिन्यांपर्यंतच्या FD वर उच्च व्याजदर देत आहे. बँक या कालावधीत ८ टक्के दराने एफडी योजनेवर परतावा देत आहे. तर 18 महिने ते 24 महिन्यांच्या FD वर येस बँक 8.25 टक्के व्याजदर देत आहे.

DCB बँक एफडी दर
DCB ही खासगी क्षेत्रातील बँक आहे. DCB बँक देखील ज्येष्ठ नागरिकांना FD योजनेवर चांगला परतावा देत आहे. ही बँक 25 ते 37 महिन्यांच्या FD वर 8.35 टक्के व्याजदर देत आहे. ही बँक 37 महिन्यांसाठी कमाल 8.50 टक्के व्याजदर देत आहे.

इंडसइंड बँक एफडी दर
इंडसइंड बँक 33 ते 39 महिन्यांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के पर्यंत व्याजदर देत आहे. तर 19 महिने ते 24 महिन्यांच्या FD वर 8.25 टक्के व्याजदर देत आहे.

बंधन बँक एफडी दर
ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव योजनांवर भरघोस परतावा देणाऱ्या बँकांच्या यादीत बंधन बँकही आघाडीवर आहे. ही बँक 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी FD वर 7.75 टक्के व्याजदर देत आहे. तर 500 दिवसांच्या FD वर ही बँक 8.35 टक्के व्याज देते.

IDFC फर्स्ट बँक एफडी दर
खासगी क्षेत्रातील बँक IDFC फर्स्ट बँक देखील त्यांच्या ग्राहकांना FD योजनांवर उच्च व्याजदर देत आहे. ही बँक 751 दिवस ते 1095 दिवसांच्या FD वर जास्तीत जास्त 7.75 टक्के परतावा देते.

Share This News
error: Content is protected !!