Viral Video

Viral Video : गणपतीच्या मंडपात नाचता नाचता तरुणाचा गेली जीव

450 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या आयुष्यात कधी काय घडेल (Viral Video) सांगता येत नाही. आता आपल्याबरोबर हसणारा – खेळणारा व्यक्ती अचानक आपल्याला सोडून जाईल असे अशी कोणालाच पुसटशी कल्पनादेखील नसेल. आता समोर आलेल्या घटनेत काहीसे असेच घडले आहे. काही वेळापूर्वी डान्स करणाऱ्या तरुणाचा क्षणार्धात मृत्यू झाला आहे. ही घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. यामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी बेभान होऊन नाचता नाचता एकाने जीव गमावला आहे.

काय घडले नेमके?
आंध्र प्रदेशातील धर्मावरम येथे गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान नाचताना एका तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता नाचता नाचता एक तरुण अचानक थांबतो आणि खाली कोसळतो. यानंतर तो तरुण उठतच नाही. हा सगळा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे.

प्रसाद (वय 26 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. आंध्र प्रदेशातील धर्मावरम नगरात गणेश चतुर्थीनिमित्त मंडप सजवण्यात आला होता. तिथे प्रसाद त्याच्या एका मित्रासोबत बेभान होऊन नाचत होता. त्यानंतर अचानक तो खाली पडला. आजूबाजूच्या लोकांनी प्रसादला रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Share This News
error: Content is protected !!