Gujrat News

Gujrat News : गुजरातमध्ये हमसफर एक्सप्रेसमध्ये भीषण आग, धावत्या ट्रेनने अचानक घेतला पेट

601 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमधील (Gujrat News) तिरुचिरापल्ली आणि श्री गंगानगर दरम्यान धावणाऱ्या हमसफर एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग लागल्यानंतर ट्रेनमधून धुराचे लोट निघू लागले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

काय घडले नेमके?
ही घटना गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात घडली. तिरुचिरापल्ली जंक्शनहून श्री गंगानगर जंक्शनकडे निघालेल्या ट्रेननंबर 22498 च्या पावर कार/ब्रेक व्हॅन कोचमध्ये आग व धूर दिसून आला. धावत्या ट्रेनमध्ये आग लागल्यानंतर प्रवाशांची पळापळ झाली. कोचमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.या अपघातात डब्यातील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.

हमसफर एक्सप्रेस गुजरातमधील वलसाडकडे जात असताना ही दुर्घटना घडली. आग लागलेल्या बोगीला ट्रेनपासून वेगळं केल्यानंतर ट्रेन पुढे रवाना करण्यात आली. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकुर यांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!