Boys 4

Boyz 4 : ‘बॉईज 4’चा धमाका; जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

951 0

मुंबई : ‘बॉईज 4’ या (Boyz 4) सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर आऊट झालं आहे. आता या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे ‘बॉईज 4’ या सिनेमात मोठा धमाका पाहायला मिळणार आहे.

‘बॅाईज’, ‘बॉईज 2’ आणि ‘बॉईज 3’ मधील धैर्या, ढुंग्या आणि कबीरची मैत्री आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या मैत्रीने अवघ्या महाराष्टात धुमाकुळ घातला होता. मात्र टिझरमध्ये त्यांच्या या मैत्रीत आता दरार आल्याचे दिसत आहे. आता ही मैत्री संपुष्टात येणार की त्यांची ही गँग आणखी वाढणार, याचे उत्तर प्रेक्षकांना येत्या 20 ॲाक्टोबरला मिळणार आहे. एवढे मात्र नक्की की हे अफलातून कलाकार यंदा तुफान धिंगाणा घालणार आहेत.

‘या’ चित्रपटात कोण कोण झळकणार?
सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत बॉईजमध्ये झळकलेली ऋतिका श्रोत्री ‘बॅाईज 4’मध्येही दिसणार आहे. तसेच अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे ही नवी फळी देखील यामध्ये पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!