Supriya Sule

Supriya Sule : “ते विधान अजित पवारांसाठी नव्हतं तर ‘या’ नेत्यासाठी होतं”, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

706 0

पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी काही दिवसांपूर्वी संसदेच्या विशेष अधिवेशनात एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या होत्या. बहिणीचे कल्याण करणारा भाऊ प्रत्येक घरात नसतो असे म्हणत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं होतं. परंतु हे विधान अजित पवारांबाबत केलं नव्हतं, असे स्पष्टीकरण आता सुप्रिया सुळे यांच्याकडून देण्यात आले आहे.

महिला आरक्षणाचं विधेयक सादर करताना केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले कि, जर एका पुरुषाने महिला आरक्षणाचं विधेयक आणलं, तर काय हरकत आहे. जर एखादा भाऊ असं वागत असेल तर काय चूक आहे. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, काश्मीर ते कन्याकुमारी सगळेच भाऊ प्रत्येक बहिणीचं हित बघतातच असं नाही. मी तुम्हाला अशी असंख्य उदाहणं सांगू शकते. त्यामुळे माझं विधान फक्त अमित शाह यांच्या वक्तव्यांबाबत होतं. असं सुप्रिया सुळें म्हणाल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!