Thane News

Thane News : उल्हासनगरमधील सेंच्युरी कंपनीमध्ये मोठा ब्लास्ट; 5 कामगारांचा मृत्यू

355 0

ठाणे : ठाण्यामधून (Thane News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहाड परिसरात असलेल्या सेंच्युरी रेयॉन कंपनीतील CS2 डिपार्टमेंटमध्ये मोठा ब्लास्ट झाला आहे. या भीषण दुर्घटनेत पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यामध्ये अनेक कामगार जखमी झाले आहेत. हा ब्लास्ट इतका भीषण होता की आजूबाजूच्या चार ते पाच परिसरातील घरांना हादरे बसल्याची माहिती स्थानिक लोकांकडून देण्यात आली आहे.

सेंच्युरी रेयॉन ही नामांकित कंपनी असून या कंपनीमध्ये जो स्फोट झाला तो नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून या स्फोटाचा तपास केला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!