Pune Crime

Pune Crime : पुण्यातील बेपत्ता झालेल्या ‘त्या’ तरुणाचा साताऱ्यात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह

835 0

पुणे : रविवारपासून बेपत्ता असणाऱ्या पुण्यातील (Pune Crime) तरुणाचा मृतदेह साताऱ्यातील खंबाटकी बोगदाजवळ सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. ध्रुव स्वप्निल सोनवणे (वय 18) असे मृत तरुणाचे नाव आहे . तो पुण्यातील बावधान परिसरातील रहिवासी होता. रविवारपासून तो घरातून निघून गेला होता. खंबाटकी बोगदानंतरच्या वळणावरील नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
खंबाटकी बोगदा परिसरातील रस्त्यालगतची झुडपे काढत असताना एक दुचाकी दिसून आली होती. त्यानंतर आणखी शोध घेतला असता ध्रुव सोनावणे याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला. दुचाकीसह तो नाल्यामध्ये पडला होता. मात्र झाडी आणि गवतामुळे तो कोणालाही दिसला नव्हता. गवत साफ करत असताना ध्रुवचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन् तपास सुरु केला. अपघातात ध्रुव याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

ध्रुव हा पुण्यातील बावधन परिसरात राहण्यासाठी होता. ध्रुवचे आई-वडिल आणि आजी हे सणसुदीसाठी अमळनेर (जळगाव) हे मूळ गावी गेले होते. त्यामुळे ध्रुव घरी एकटाच होता. त्यानंतर ध्रुवच्या आत्याने घरी चौकशी केली असता ध्रुव घरी नसल्याचे समजलं. त्यानंतर आत्याने सीसीटीव्ही चेक केलं असता तो रात्री एकच्या दरम्यान घरातून बाहेर गेल्याचे आढळून आले. यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात ध्रुव बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. ध्रुवचे कुटुंबीय पाच दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. अखेर खंडाळ्याजवळील खंबाटकी घाटाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!