धनगर समाजाचा (Dhangar Reservation)अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सतरावा दिवस आहे. या आंदोलनातील दोघांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या दोघांचीही तब्येत खालावली आहे. अहमदनगरच्या चोंडीमध्ये उपोषण करणाऱ्या सुरेश बंडगर यांची प्रकृती खालावलीय तर बाळासाहेब रुपनवर यांच्यावर पुण्यातल्या ससूनमध्ये उपचार सुरू आहेत.
बैठक निष्फळ
धनगर समाजाच्या (Dhangar Reservation) एसटी आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर घेतलेली बैठक निष्फठ ठरली आहे. सरकारनं तोडगा काढण्यासाठी दोन-तीन महिन्यांच्या वेळ मागितला. मात्र चौंडीमध्ये सुरू असलेलं उपोषण मागे न घेण्याची भूमिका यंशवंत सेनेकडून घेण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील आंदोलनात सांगितले होते की पहिल्या कॅबिनेटमधे धनगर आरक्षण देऊ. पण कुठल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा ब्र काढला जात नाही.
दरम्यान, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आरक्षणावरून चाललेल्या आंदोलनात बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय. सरकारने लेखी आश्वासन दिलं नाही तर सोमवारपासून बेमुदत उपोषणाचे अस्त्र उभारण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून देण्यात आला आहे.