Chembur Crime News

Chembur Crime News : धक्कादायक ! आरोपीने घरात घुसून महिलेसह तिच्या मुलीवर… चेंबूर हादरलं

908 0

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील कल्याणमध्ये आईसोबत जात असलेल्या मुलीची भरदिवसा हत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आता अशीच एक थरारक घटना मुंबईच्या चेंबुर परिसरात (Chembur Crime News) घडली आहे. यामध्ये एका माथेफिरुने महिलेच्या घरात घुसून महिला आणि तिच्या मुलीवर वार करून स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठया प्रमाणात खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
राहुल निषाद (वय 34 वर्षे) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. राहुल याने सेल कॉलनी परिसरातच राहणाऱ्या एका 32 वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिच्यावर आणि तिच्या चार ते पाच वर्षांच्या मुलीवर चाकूने वार केले. चेंबूरच्या सेल कॉलनी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी राहुल एवढयावरच थांबला नाहीतर त्याने महिलेवर आणि तिच्या मुलीवर हल्ला केल्यानंतर स्वतःवर देखील वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

यानंतर त्याला तातडीने उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News
error: Content is protected !!