Gopichand Padalkar

Gopichand Padalkar :’आमच्या गाडीला बिरेक न्हाय बरका’, गोपीचंद पडळकरांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

723 0

सांगली : कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ,वक्तव्यामुळे किंवा त्यांच्या कृतीमुळे सातत्याने चर्चेत असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि अजित पवार गटामध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर खालच्या दर्जाची टीका केल्यामुळे राजकीय वातारण पेटले आहे. यादरम्यान आता गोपीचंद पडळकर यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

गोपीचंद पडळकर आणि चर्चा हे आता समीकरणच बनलं आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांचं नवीन गाणं आता समोर आलं आहे. त्यांच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. “आमच्या गाडीला बिरेक न्हाय बरका” असे या गाण्याचे बोल आहेत. सध्या हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

अजित पवार यांना आम्ही उपमुख्यमंत्री मानत नाही असं म्हणून गोपीचंद पडळकर यांनी भाजपच्याच निर्णयाविरोधात भूमिका मांडली. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या बारामतीसह पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे.

Share This News
error: Content is protected !!