Sukhdool Singh Shot Dead

Sukhdool Singh Shot Dead : मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी सुक्खा सिंगची हत्या

897 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची जून महिन्यात हत्या झाल्याच्या मुद्द्यावरुन भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरु असतानाच आणखीन एका खलिस्तानी दहशतवाद्याची कॅनडात हत्या करण्यात आली आहे. गँगस्टर सुखदूल सिंग ऊर्फ सुक्खा दुनेके (Sukhdool Singh Shot Dead) असे हत्या करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो एक मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता.

सुक्खा हा पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये देविंदर बंबीहा टोळीचा कारभार पाहत होता. तो या टोळीसाठी निधी गोळा करण्याचं काम करायचा. तो खोट्या पासपोर्टच्या आधारे 2017 साली कॅनडामध्ये पळून गेला. तो खलिस्तानी फुटीरतावादी दहशतवाद्यांच्या संपर्कात होता असं सूत्रांचं म्हणणं आहे.

मात्र तो प्रामुख्याने खंडणी मागणे, लोकांना धमकावणे आणि सुपऱ्या घेऊन हत्या करण्याची कामं करायचा. सुक्खा आणि त्याच्या टोळीतील इतर लोक हे वेगवेगळ्या राज्यांमधील मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या यादीत आहे. सुक्खा हा पंजाब आणि आजूबाजूच्या प्रांतामध्ये प्रामुख्याने सर्व गुन्हेगारी स्वरुपाची कामं करायचा.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide